breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही’; छगन भुजबळ

Chagan Bhujbal : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तर ओबीसीच्या ताटात कुणाला वाटेकरी नको, म्हणून ओबीसी आंदोलन सुरु आहे. अर्थात या ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व आपसुकच छगन भुजबळ यांच्याकडे येते. भुजबळ हे सरकारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहे. त्यांनी वडी गोद्रीत मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील, आरक्षणाचा गरज या सर्वांवर जोरदार फटकेबाजी केली. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नसल्याचे ते म्हणाले.

आम्ही काही मागत नाही. आम्ही म्हणतो, आमचं आरक्षण आमच्या ताटातील तसंच राहू द्या. त्यांना दुसरं ताट द्या. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही पाठिंबा दिला. त्यांना वेगळं आरक्षण दिलं. तीन वेळा कायदा आला. आम्ही तीनवेळा पाठिंबा दिला, असे छगन भुजबळ म्हणाले. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे अनेकदा म्हटले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्याची बाजू त्यांनी मांडली आहे.

हेही वाचा   –  OBC आंदोलनावर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय? संजय राऊत म्हणाले.. 

आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आदिवासी, दलित समाजातील लोक कलेक्टर झाले, पोलीस कमिशनर झाले. पण आजही झोपडपट्ट्यात दलित आदिवासी राहतात. गरीबी हटली नाही. जे गरीब आहे. पिचलेले आहे. मुख्यप्रवाहाच्या बाहेर आहे, गावागावात अन्याय सहन करत आहेत. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी समान अधिकार देण्यासाठी आरक्षण दिलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी संविधानातून आरक्षण दिलं. महात्मा फुलेंनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं सर्व समान आहेत. जे गरीब आहेत. त्यांना वर आणलं पाहिजे. शाहू महाराजांनीही आरक्षण दिलं, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

लढाई संपलेली नाही. निवडणुकीच्या आधी सुद्धा, निवडणुकीनंतरही गावागावत हल्ले करण्यात आले. मारपीठ करण्यात आली. पोलिसांनी डोळेझाक केली. हे सर्व पाहून वेदना झाल्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये धनशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती नाही तर लोकशक्ती अत्यंत मोठी असल्याचे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button