ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

एचए स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनातून आठवणींना उजाळा

1987 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

पिंपरी : पिंपरीतील एचए स्कूलच्या 1987 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला. या बॅचकडून 11 वे ‘स्नेह संमेलन आयोजित केले होते. या वेळी तब्बल 36 वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आले. देशातील विविध राज्यात राहणार्‍या मित्र-मैत्रीणींनी यामध्ये सहभाग घेतला.

या वेळी उपस्थितांचे स्वागत मंदा कंद, संयोगिता लोखंडे, शुभदा कुलकर्णी, सुरेंद्र मोरे, सुनील पवार, अजेय निलजकर यांनी केले. राहुल गुजर, हेमंत पडगळ, युवराज फाळके, मनोज वाघ, शुभदा कुलकर्णी, पुर्वा ओक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्रार्थना, स्वागत गीत सुषमा काशीकर हिने गायले. वंदना बडवे, लता थोरात यांनी नृत्य सादरीकरण केले.

उपस्थितांनी आपला संपूर्ण परिचय देऊन मनोगत व्यक्त केले. शुभदा कुलकर्णी, अभय पिंपळीकर, राजेश चिट्टे, राजश्री कलापुरे (प्राणी मित्र), प्रताप सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. माजी सैनिक मेजर सुनील पवार यांनी भारतीय लष्करातील जवानाचे संदर्भात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या वेळी ऑक्टोबर महिन्यातील मित्रांचे वाढदिवस केक कापून साजरे कऱण्यात आले.

दुपारच्या सत्रात विविध गुण दर्शन, नृत्य, मराठी, हिंदी चित्रपटातील गाणी गायन झाले. निरोप व आठवण म्हणून सर्वांना भेट वस्तू देऊन समारोप झाला. राजेश चिट्टे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button