धक्कादायक! अकोल्यात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात मेलेल्या उंदराचे अवशेष, दहा विद्यार्थ्यांना विषबाधा
![Remains of a dead rat in the nutrition of students in Akola](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Akola-School-Students-Food-Poisoning-780x470.jpg)
Akola School Students Food Poisoning | अकोला शहरातील मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अकोला महापालिकेच्या शाळा क्रमांक २६ शिवसेना वसाहत इथं विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय अन्नातून ही विषबाधा झाल्याच प्राथमिक समोर आली आहे. या खिचडीमध्ये मृत उंदराचे अवशेष सापडले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. हा आहार खाल्ल्यावर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाल्यावर त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले. दहा विद्यार्थीवर उपचार सुरू आहेत. ९ ते १० वयोगटातील हे सर्व विद्यार्थी आहेत.
हेही वाचा – रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा; म्हणाले..
दरम्यान, हिंगोलीत काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात धार्मिक कार्यक्रमात प्रसादासाठी तयार करण्यात आलेल्या भगरीतून शेकडो ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंगोलीतील सुमारे दीडशे ग्रामस्थांना दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातील सर्वांची प्रकृती स्थिर होती.