Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
RSS च्या इमारतीची जैश-ए-मोहम्मदकडून रेकी ही अतिशय गंभीर बाब: फडणवीस
![Reiki from Jaish-e-Mohammed of RSS building is a very serious matter: Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Devendra-Fadnvis.jpg)
नागपूर | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंत अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच नागपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर जैश-ए-मोहमद संघटनेने रेकी केली आहे. असं वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल (7 जानेवारी) जळगावात केलं होतं. ज्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश-ए-मोहम्मदकडून रेकी केली जाणे अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील असा विश्वास आहे. याला अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवी यांनी दिली आहे.