नोकरीची संधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती
![Recruitment of 105 Data Entry Operators in Pimpri-Chinchwad Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/job-opportunities-780x470.jpg)
कंत्राटी पद्धतीने भरती करणार : शिक्षण विभागाचा निर्णय
पिंपरी : प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.
पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्सेल सीटमध्ये माहिती भरणे यासह आदी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे.
हेही वाचा – Maharashtra Monsoon : राज्यात आज पाऊस, हवामान खात्याचा इशारा
यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा (PCMC) परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याचा विचार करून प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.