breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई! महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईचे साधन नसल्याने आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. RBI ने बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रिझर्व्ह बँकेने अधिकृत निवेदनात म्हटलं की, कोल्हापुरातील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड ४ डिसेंबरपासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. याबरोबरच बँकेत पेमेंट किंवा ठेवी घेण्यावरही पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती देताना सेंट्रल बँकेने सांगितले की, या सहकारी बँकेकडे बँकिंग सेवा देण्यासाठी पुरेसे भांडवल नाही. याबरोबरच भविष्यात कमाईच्या साधनांबाबत कोणतीही ठोस योजना मांडण्यात बँक अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरबीआयच्या नियमांचे पालन होत नसल्याने आणि ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आरबीआयने बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा  –  धक्कादायक..! महाराष्ट्रात वर्षभरात २२ हजार ७४६ आत्महत्या

‘या’ बँकांना ठोठावला दंड

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याबद्दल अनेक बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. यामध्ये आरबीआयने एचडीएफसी बँक, बँक ऑफ अमेरिकासह तीन सहकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला आहे. याशिवाय आरबीआयने जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेड, श्रीलक्ष्मी कृपा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, द कोणार्क अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि चेंबूर नागरी सहकारी बँक लिमिटेड यांनाही दंड ठोठावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button