Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Honey Trap | प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रफुल्ल लोढा याच्या अडचणीत आणखी वाढ होणार

पुणे | हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात मुंबईतील दाखल करण्यात अटकेत असलेला प्रफुल्ल लोढा याचे काळे कारनामे आता समोर येत आहेत. प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोढा याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ‘हनी ट्रॅप’ सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढा याच्या विरोधात बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा याने फिर्यादी यांना तुमच्या पतीला नोकरी लावतो, असे सांगून त्यांना २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता बालेवाडी येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली होती.

हेही वाचा     :      ‘‘एसबीपीआयएम’’ शैक्षणिक स्वायत्तता अभिमानास्पद; ज्ञानेश्वर लांडगे

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, लोढावर बलात्कार व धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेतला जाणार आहे, असे बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले आहे.

कोण आहे प्रफुल्ल लोढा..?

भाजपमध्ये सामील झालेल्या प्रफुल्ल लोढावर हनी ट्रॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी प्रफुल्ल लोढावर मुंबईत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक POCSO कायद्याचा, दुसरा बलात्कार आणि हनी ट्रॅपचा आहे. मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि अटकही करण्यात आली आहे. हनीट्रॅप प्रकरणानंतर लोढा चांगलेच चर्चेत आले आहे.

एकनाथ खडसेंची मागणी

हनीट्रॅप प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केली आहे. लोढाकडे काही महत्त्वाचे पुरावे असून, त्यात कोण कोण राजकीय नेते आहेत, याचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करावा, असंही खडसे म्हणाले. मंत्री गिरीश महाजन आणि लोढा यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, नंतर संबंध बिघडले आणि लोढाने महाजनांवर गंभीर आरोप करत तक्रार दिली होती. एकनाथ खडसेंच्या आरोपानंतर प्रफुल्ल लोढा चांगलेच चर्चेत आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button