ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

‘राज ठाकरे शिवद्रोही, त्यांनी शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी’

कोल्हापूर |बाबासाहेब पुरंदरे जेम्स लेनचा खरा ब्रेन होते. अशा पुरंदरेंचे राज ठाकरे सतत समर्थन करत असतात हे आक्षेपार्ह आहे. राज ठाकरेदेखील या बदनामी कटात सहभागी आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी अशी मागणी डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या विवाहात शहाजी महाराज गैरहजर होते असे दाखवले आहे. महाराजांचा महाराणी सईबाई यांच्यासोबत विवाह पुणे मुख्यमंत्री झाल्याचे पुरंदरे सांगतात. पण शिवाजी महाराजांचा महाराणी सईबाई यांच्यासोबत विवाह विजापूर मुक्कामी १६४० मध्ये झाला होता. या विवाहाला भोसले निंबाळकर परिवारातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
खुद्द आदिलशहाने विवाहसमारंभाला येऊन शुभेच्छा दिल्याचा पुरावा निंबाळकर दप्तरात सापडतो. तरीदेखील शहाजीराजांनी गैरहजर दाखवण्यासाठी पुरंदरे यांनी हे लग्न पुणे मुक्कामी झाले असे दाखवले आहे. इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांच्या शिवछत्रपती एक अभ्यास या ग्रंथात हा उल्लेख आहे. शिवाजी विद्यापीठाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. शिवाजी महाराजांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्या काळात त्यांचा मुक्काम शहाजीराजे आदिलशाही पदरी असल्याने विजापूर बंगळुरू परिसरात होता.

बंगळुरूमधून शिवाजीराजे १६४२ मध्ये खेड शिवापूर इथे आले. त्यानंतर ते १६४५ ला पुण्यात गेले. पण पुरंदरेनी जाणीवपूर्वक शहाजीराजांना गैरहजर दाखवण्यासाठी त्यांनी ते लग्न पुणे मुक्कामी झाले असे दाखवले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button