सावधान! पुण्यासह या जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार
![Rain will lash this district along with Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Maharashtra-Weather--780x470.jpg)
पुणे | पावसासंदर्भात महत्वाची बातमी आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अशातच हवामान विभागानं आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचरोली, वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘आपलं हिंदू राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, ते वाढलं पाहिजे’; स्वप्नील कुसाळे
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिना भरापासून संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक शेत शिवारात पाणी साचून राहिल्याने पीक खराब होत असल्याचं बघायला मिळत आहे. त्याचबरोबर नुकत्याच काढनीवर आलेल्या उडीद मूग पिकाच्या शेंगामधील दान्याना कोंब फुटल्याने शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून, शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.