breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Guinness World Record : गोष्टी सांगण्यात पुणेकर अव्वल, चीनचा विक्रम मोडला

पुणे : नॅशनल बुक ट्रस्ट मार्फत आयोजित पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने एस. पी. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या या उपक्रमात ३ हजार ६६ पालकांनी सहभागी होत, त्यांनी आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

या उपक्रमात पुणे महापालिकेच्या शाळा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावेळी सुमारे ३ हजारांहून आधिक पालकांनी आपल्या पाल्यांना विविध गोष्टी, कथा वाचून दाखवल्या आहे यापूर्वीचा, पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी किंवा कथा सांगण्याचा विश्वविक्रम चीनच्या नावे असून, तो तोडण्यात पुणे यशस्वी ठरलं आहे.

हेही वाचा  –  संसदेवरील हल्ल्याच्या चौकशीची जबाबदारी ‘ईडी’, ‘इन्कम टॅक्स’कडे सोपवली काय? ठाकरे गटाचा हल्लाबोल 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, भाग्यश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button