गणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

एक्झर्बिया अॅबोड सोसायटीच्या गणेश मंडळाच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

वडगांव (मावळ): लहानग्यांचे भावविश्व, आकलन क्षमता वृद्धींगत व्हावी, लहान मुलांना विविध स्पर्धांविषयी कुतूहल असते, विविध स्पर्धांमुळे मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होते, एकाग्रता वाढते, मुलांमध्ये प्रंसगी स्वतः निर्णय घेण्याची क्षमता वाढते, एखाद्या गोष्टीबाबत तर्क करण्याचे कौशल्य विकसित होते, संवेदनशीलता वाढते, समाज आणि देशाविषयी प्रेम निर्माण होते, मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. नेमका हाच हेतू समोर ठेऊन एक्झर्बिया अॅबोड रहिवाशी गणेश मंडळाच्या वतीने लहानग्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सोसायटीमधील लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून खेळांचा आनंद घेतला.

जांभुळगाव येथील एक्झर्बिया अॅबोड सोसायटीच्या गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आयोजित विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

मंडळाच्या वतीने लिंबू चमचा, गोणी उडी अशा अनोख्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनील पवार, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, सचिव दिनेश सकट, दीपक पाटील, नीलेश परदेशी यांनी कार्यक्रमाचे उत्तमप्रकारे नियोजन केले. मंडळाचे सदस्य दीपक पाटील यांनी स्पर्धात्मक कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन केले.

लिंबू चमचा स्पर्धेचे विजेतेः-
छोटा गटः-
प्रथम क्रमांक वेदिका भोईटे, द्वितीय क्रमांक रेणुका, तर तृतीय क्रमांक आर्यन

मोठा गटः-
प्रथम क्रमांक विणा भोरे, द्वितीय क्रमांक शौर्य दुबे, तृतीय क्रमांक विहान भोरे

गोणी उडी स्पर्धेचा निकालः-
छोटा गटः-
प्रथम क्रमांक अन्वी शिरसुरवार, द्वितीय क्रमांक तुषार पाटील, तर तृतीय क्रमांक वेदिका भोईटे हिने पटकावला.

मोठा गट ः-
प्रथम क्रमांक अंशुमन चव्हाण, द्वितीय क्रमांक रौनक शर्मा, तृतीय क्रमांक विहान भोरे याने पटकावला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button