breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला रायगडमधून अटक

पुणे | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक केली गेली. पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत. त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती. या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर, दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा     –      गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक 

पुणे पोलिसांना अखेर मनोरमा खेडकरला यांचा शोध लागला. पौड पोलिसांच्या पथकाने रायगडमधून त्यांना अटक केली. तसेच पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात ३०७ हे कलम वाढवण्यात आले आहे. रायगडमधून पोलीस मनोरमा खेडकर हिला घेऊन निघाले आहेत. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर फरार झाले होते. त्यांचा शोध सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button