पै.बाळासाहेब रामचंद्र लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा उत्साहात
मोशीगाव येथील प्रसाद सस्ते, तन्मय काळभोर, समाधान दगडे ठरले महाकेशरीचे मानकरी
![Mr. Balasaheb Ramchandra Landge, on his birthday, Pimpri Chinchwad, city selection, test, wrestling competition, in excitement,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/mahakesari-bhosari-780x470.jpg)
पिंपरी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे असून संयोजक पै. नितिन बाळासाहेब लांडगे, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन भवानी तालीम यांच्यावतीने पै.बाळासाहेब रामचंद्र लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहर निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही निवड चाचणी स्पर्धा भोसरी येथील पै. मारुती रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल येथे उत्साहात पार पडली. यामध्ये (वजन गट 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97, 86 ते 125 महाराष्ट्र केसरी) माती आणि गादी विभागामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मोशीगाव येथील प्रसाद सस्ते तन्मय काळभोर आकुर्डी, समाधान दगडे, चिखली हे महाकेशरीचे मानकरी ठरले. या कुस्ती स्पर्धांसाठी पंच म्हणून संदीप साळवे, चंद्रकांत मोहोळ, रोहिदास आमले, नीलेश मारणे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेबद्दल माहिती देताना संयोजक पै. नितीन बाळासाहेब लांडगे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने धाराशिव येथे होत असलेली ६५ वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अस्थायी समिती निरीक्षक महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद निरिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड चाचणी निवड कुस्ती स्पर्धा घेण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागातील विजेते खालीलप्रमाणे
गादी विभाग/ खुला गट
5 7 किलो
प्रथम – प्रणव सस्ते, मोशी
सुयश दास – दिघी
61 किलो
प्रथम – योगेश तापकी, चऱ्होली
द्वितीय – प्रथमेस पाटील, पिंपरी
65 किलो
प्रथम- महेश जाधव, भोसरी
द्वितीय – राहुल माने – आकुर्डी
70 किलो
प्रथम- परशुराम कँप – आकूर्डी
द्वितीय – स्वप्नील सुकुंडे, वाल्हेकरवाडी
74 किलो
प्रथम – दिग्विजय काळे
द्वतीय – अजिंक्य सांडभोर, चिखली
79 किलो
प्रथम – पवन माने, आकुर्डी
द्वितीय –
86 किलो
प्रथम – सौरभ सिंगाडे, किवळे
द्वितीय – यश थोरवे, चऱ्होली
92 किलो
प्रथम-सौरभ जाधव – दिघी
द्वितीय – निरंजन बालवडकर, जगताप डेअरी,
97 किलो
प्रथम – शुभम गवळी, भोसरी
द्वितीय – रंजीत मोकाशी, मोशी
माती विभाग
57 किलो
प्रथम-श्री जाधव
द्वितीय – महेश सलगर, पिंपरी
69 किलो
प्रथम – अजिंक्य माचुत्रे, चिंचवड
द्वितीय – रुद्र वाळुंजकर, पिंपरी
65 किलो-
प्रथम – संकेत माने, आकुर्डी
द्वितीय – अमित म्हस्के, भोसरी
70 किलो-
प्रथम – किरण तळेकर, डुडुळगाव
द्वितीय – जय वाळके, दिघी
74 किलो –
प्रथम – रविंद्र गोरड, पिंपरी
द्वितीय – कार्तिक फुगे भोसरी
79 किलो
प्रथम – अनिकेत लांडगे, भोसरी,
द्वितीय – पृथ्वीराज जाधव, भोसरी
86 किलो
प्रथम – यशराज अमराळे, चऱ्होली
द्वितीय – विशाल कोळी, भोसरी
92 किलो
प्रथम- विवेक शेलार, वाकड
द्वितीय – पवन चव्हाण, भोसरी
97 किलो
प्रथम – तेजस फंगसे, ताथवडे
द्वितीय – यश नखाते, रहाटणी
महाकेशरी
प्रसाद सस्ते, मोशीगाव, तन्मय काळभोर आकुर्डी,
समाधान दगडे, चिखली