breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

Pimpri-Chinchwad : चिंचवडमध्ये धावत्या कारने घेतला पेट, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी : चिंचवडमधील संभाजीनगर येथे धावत्या ओमीनी मोटारीने आज (८सप्टेंबर) सकाळी साडे नऊच्या सुमारास पेट घेतल्याची घटना घडली आहे. चालकाने उडी मारत आपला जीव वाचवला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

एमएच १२, एएक्स ५७८७ ही ओम्नी कार थरमॅक्स चौकाकडून केएसबी चौकाकडे जात होती. संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल शाळेजवळ मोटारीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकाने उडी मारली. मोटार पेटल्याने धुराचे लोट हवेत पसरले होते. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. मोटारीतील लॅपटॉप, इतर साहित्य जळाले.

हेही वाचा – ‘मराठा विरूद्ध ओबीसी वाद निर्माण करून भाजपाला महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. मात्र, बंब घटनास्थळी येईपर्यंत मोटार जळाली. मोटारीने पेट घेताच चालकाने प्रसंगावधान दाखवत उडी मारली. त्यामुळे कुठलीही इजा झाली नाही. परंतु गाडीमध्ये असलेला लॅपटॉप व इतर सामान जळाल्याचे प्रत्यक्षदर्शी अमित गोरखे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button