‘‘क्वीन अँड किंग ऑफ इंडिया’’ स्पर्धेत पारुल गुप्ता, आकांक्षा कुंभार, आर्या पिंगळे यांची बाजी
![Parul Gupta, Akanksha Kumhar, Arya Pingle win in Queen and King of India competition](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Queen-and-King-of-India-competition-780x470.jpg)
पिंपरी : कुसुम वात्सल्य फाउंडेशन आणि साई सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीने झालेल्या ‘‘क्वीन अँड किंग ऑफ इंडिया’’ स्पर्धेचे प्रथम विजेत्या मिसेस आकांक्षा कुंभार, मिसेस पारुल गुप्ता आणि मिस्टर जुड सॅनसन, तर किड्स श्रेणीमध्ये आर्या पिंगळे ,कानिक्षा पगारे आणि सार्थक टिंगरे हे विजेते ठरले.
पहिल्या आणि दुसऱ्या धावपटूमध्ये अनुक्रमे कु. आकांक्षा गायकवाड, कु.माधुरी शिवडे, मिसेस माधुरी जायभाये व मिसेस कल्पना कंत ठरल्या. या प्रसंगी जागतिक महिला दिनानिमित्त ‘वुमन पॉवर ॲवॉर्ड देण्यात आले.
स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बॉलीवूड अभिनेते अशीत चॅटर्जी, मनीषा समर्थ, प्राण जैन, हर्षल गुंड पाटील,महेश धाडवे पाटील,महेश मरोळ,समीर खोत,डॉ.मृणाल इमानदार योगेश गोंधळे,जनसेवक अनिल पवार पाटील,धनश्री कटारे,क्वीन अँड किंग पेजंट शो ऑफ इंडियाचे ब्रँड अँबेसिडर संजीवनी खांडगे, महाराष्ट्रचे आरचू मुकेश आदि मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी येथील सीजन बँक्वेट येथे झालेल्या क्वीन अँड किंग ऑफ इंडिया स्पर्धेचे संयोजन कुसुम वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील आणि साई सोशल अँड स्पोर्ट फाउंडेशनचे फिरोज खान तसेच जयप्रकाश पाटील, हर्षवर्धन पाटील यांनी केले होते.प्रतिभावान फेरी, प्रश्न उत्तरे आणि पारंपारिक फेरी घेत स्पर्धकांनी शानदार सादरीकरण केले.यावेळी आठ राज्यातील स्पर्धकांनी पारंपरिक पोशाख परिधान करून सादरीनकरण केले. पस्तीस स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
स्पर्धेची ज्युरी म्हणून मेधा जोशी आणि झहिरा शेख यांनी काम पाहिले तर कोरिओग्राफी विशाल घोलप सांजशृंगार ज्योती कुंभार, प्रणाली वाघुले आणि सहकारी यांनी केले, तर सूत्रसंचालन महेश सोनी यांचे होते.आलेल्या सर्व पाहुणे तसेच हितचिंतक यांचे आभार कुसुम वात्सल्य संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील यानी केले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/image-21-1024x683.png)