“पाकिस्तानने औकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा, अन्यथा नामोनिशाण”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले

आळंदी: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी देशाच्या सुरक्षेसाठी साकडं घातलं आहे. भारत पाकिस्तानच्या गोळीच उत्तर मिसाईल ने देत आहे. पाकिस्तान ने आपल्या औकातीत राहून च भारताशी पंगा घ्यावा. हा नवीन भारत आहे. अन्यथा भारतीय जवान पाकिस्तान चा नामोनिशाण मिटवल्याशिवाय राहणार नाही. अस मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. एकनाथ शिंदे हे आळंदीत पत्रकारांशी बोलत होते.
संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या ७५० व्या जन्मोत्सवनिमित्त इंद्रायणी नदीची आरती एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याचं आश्वासन पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.एकनाथ शिंदे म्हणाले, देशाच आणि महाराष्ट्राच रक्षण व्हावं अस साकडं माऊलींच्या चरणी घातलं आहे. पाकिस्तान ला भारतीय जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. पाकिस्थान ने आपल्या औकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा. पाकिस्तान चा प्रत्येक हल्ला जवान परतवून लावत आहेत. सध्या राजकारण करण्याची वेळ नाही. आपण सर्वांनी जवानांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे खंबीर उभं राहण्याची वेळ आहे.
हेही वाचा – ‘सायबर सुरक्षेमधून प्रगती शक्य’; डॉ. शेंग लुंग पेंग
देशावरील संकट परतवून लावण्याची हिंमत आपल्या जवानामध्ये आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पाकिस्तान ने त्यांचे माकड चाळे बंद न केल्यास आणि त्यांची नाटकं न थांबविल्यास पाकिस्थान चा नामोनिशाण मिटवल्याशिवाय जवान राहणार नाहीत. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत महायुती कायम राहणार आहे. महायुती जिंकू सुद्धा अस ही शिंदे म्हणाले आहेत.