उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा जोरदार हल्ला

India Vs Pak : भारत आणि पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा गोळीबाराला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. राजौरी, उरी, जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला आहे. तर अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले आहे. भारतीय लष्कराने त्याला चोख प्रत्युत्तर देत हे सगळे हल्ले परतवून लावले आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या दिवशीही पाकिस्ताकडून नापाक हल्ले सुरूच आहे. सीमेवर तणाव वाढत चाललेला असताना पाकिस्तान लष्कराने राजौरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं आहे. भारतीय लष्करानेही या हल्ल्याला तात्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा – PCMC : अखेर चिखली, चऱ्होलीची ‘टीपी स्कीम’ रद्द होणार!
या भागात तोफगोळ्यांचा आवाज आणि गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षा दल सतर्क आहेत आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहेत. पंजाबमधील फिरोजपूर आणि राजस्थानमधील जैसलमेरमध्ये संपूर्ण ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत त्यांचे 4 ड्रोन पाडल्याचे समजत आहे.