अहमदनगरसह राज्यातील अनेक बाजार पेठांमध्ये मागणीपेक्षा “कांदा दरात मोठी घसरण
![Onion prices fall sharply in town](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-20-at-11.58.42-AM.jpeg)
अहमदनगर | कांद्याचे दर रात्रीतून बदलतात हे आता व्यापाऱ्यांनाच काय शेतकऱ्यांनाही कळून चुकलेले आहे. असे असताना मध्यंतरी जवळपास महिनाभर कांद्याचे दर टिकून होते. दराच्या बाबतीत लहरी असलेला कांदा यंदा टिकून राहिल्याने केवळ लाल कांद्याचाच नाही तर उन्हाळी कांद्याचा देखील पैसाच झाला होता. पण गेल्या आठ दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे गणितच हुकले आहेत. अहमदनगरसह राज्यातील अनेक बाजार पेठांमध्ये मागणीपेक्षा आवक वाढल्याने कांद्याचे कमालीचे घसरले असल्याचे पाहायला मिळाले. काल शनिवारी नगर जिल्ह्यात तर कांद्याचा भाव क्विंटलला ११०० रुपये इतका कमी होता.
गेल्या आठ दिवसांमध्ये लाल कांद्याच्या दरात तब्बल ७६४ रुपयांची घसरण झाली आहे तर उन्हाळ कांद्याच्या दरात ६३० रुपयांची घसरण झाली आहे. मागणीपेक्षा आवक अधिक तर झालीच पण युध्दजन्य परस्थितीमुळे निर्यातीमध्येही अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, अचानक घटलेल्या दरामुळे कांदा उत्पादकांना ११ कोटी ७२ लाख रुपयांचा फटका बसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.नगर जिल्ह्य़ातील वांबोरीत काल १०० ते १३०० रुपये, कोपरगावला २७५ ते १०७५ रुपये, घोडेगावला ५०० ते ११०० रुपये, वैजापुरात ३०० ते १२०५ रुपये असा भाव होता.कांद्याचे हे कोसळलेले दर पाहून शेतकर्यांच्या डोळ्यात मात्र पाणी येऊ लागले आहे.