breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये भर दिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील भर दिवसा एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

एकाच चारचाकी गाडीतून निघालेल्या योगेश जगताप आणि सागर शिंदे यांच्यामध्ये वाद झाला. आपापसात झालेल्या वादातून सागर शिंदे याची गोळ्या झाडून हत्या केली. अद्याप नेमकं कारण समोर आलेलं नाही. त्या वाहनाने काही गाड्यांना धडक दिली. ही घटना औंध-रावेत बीआरटी मार्गावर असलेल्या रक्षक चौकाजवळ घडली आहे.

हेही वाचा – ‘चांद्रयान-३’ चं यशस्वी लँडिंग, आता पुढे काय? किती महत्व?

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेला सागर शिंदे मोटारीतून त्याच्या काही साथीदारांसह जगताप डेअरी च्या दिशेने जात होते. दरम्यान, धावत्या मोटारीमध्येच सांगवी पुलावर त्यांच्यात वाद झाले. पहिली गोळी झाडली तेव्हा जीव वाचवण्यासाठी सागर शिंदे कारमधून उतरून पळत असताना आरोपीने त्याच्या पाठीत दुसरी गोळी मारली आणि शिंदे जागीच ठार झाला.

फिल्मी स्टाईलमध्ये घडलेल्या या थरारक घटनेमुळे पिंपरी-चिंचवडचा सांगवी परिसर हादरला. याप्रकरणी मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्येच्या घटनेत कोण सहभागी आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. गुंडविरोधी पथकाचे प्रमुख हरीश माने यांच्या पथकाने गोळीबार करणारा मुख्य आरोपी योगेश जगताप याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button