अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक दर्शनासाठी 5 गाड्या सोडण्यात येणार
![On the occasion of Angaraki Chaturthi, 5 trains will be released for Ashtavinayak darshan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/msrtc-ashtavinayak-ganpati-780x470.jpg)
वल्लभनगर आगरातून नागरिकांसाठी अष्टविनायक दर्शनासाठी 5 गाड्यांची व्यवस्था
पिपंरी : अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंगळवार 10 रोजी अष्टविनायक दर्शनासाठी वल्लभनगर आगरातून महामंडळाने नागरिकांसाठी 5 गाड्यांची व्यवस्था केली आहे. प्रवाशांच्या मागणीमुळे या गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचं महामंडळाने सांगितले आहे.
या पुर्वीच्या चारही गाड्यांचे बुकिंग फुल झाले आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी पाचव्या गाडीचे बुकिंग देखील सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारामधून गाडी निघून ती शिवाजीनगर स्वारगेट, थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महड, पाली येथे जाणार आहे.
प्रवाशांना अंगारकी चंतुर्थीनिमित्त अष्टविनायकांचे दर्शन घेता येणआर आहे. प्रवासी भक्तांना यात्रा कालावधीत ओझर येथील भक्त निवासात मुक्काम करता येणार आहे. या ठिकाणी भोजन आणि निवासाची व्यवस्था भक्तांना स्वत:च करावी लागणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुखांनी केले.