breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

Pune : पुण्यातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार?

पुणे : पुणेकर ओला, उबेर रिक्षाने प्रवास करत असतात. स्वस्त आणि चांगली सेवा पुरवली जाते त्यामुळे पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असतो. मात्र, आता पुण्यातील ओला, उबेर रिक्षा बंद होणार आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

मोटार वाहन समुच्चयक मार्गदर्शक सूचना २०२० नुसार आवश्यक बाबींती पूर्तता होत नसल्याने मे. अॅनी टेक्नॉलॉजी प्रा. लि. पुणे, मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., मे. किव्होल्युशन टेक्नॉलॉतीत प्रा. लि. पुणे आणि मे. रोपन ट्रान्सपोर्ट्रेशन सर्व्हिस प्रा. लि. पुणे या चार कंपन्यांना तीनचाकी रिक्षांचे अॅग्रीगेटर लायसन्स पुणे आरटीने नाकारले आहे.

पुणे आरटीओकडे ओला, उबेर, रॅपीडसह शहरातील एका कंपनीने अर्ज केले होते. यामध्ये ओला, उबरने तीन चाकी आणि चारचाकीसाठी अर्ज केला आहे, तर इतर कंपन्यांनी तीन चाकीसाठी अर्ज केले होते. पुणे प्रदेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत चार कंपन्यांचे अॅग्रीगेटर लायसन्स नाकारताना या अर्जांचा विचार करण्यात आला.

मोटार व्हेईकल अॅग्रीगेटर गाईडलाईन्स, २०२० मधील तरतुदीनुसार चारही अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर सादर करण्यात आले होते. चारही कंपन्यांचे ऑटो रिक्षा संवर्गात अॅग्रीगेटर लायसन्स नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि. व मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि. यांना चारचाकी हलकी मोटार वाहने संवर्गाकरीता अॅग्रीगेटर लायसन्स जारी करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घेण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button