breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्र

अरेरे भयानक… सोशल मिडियाचा अतिरेक… नाशिक जिल्हा बनतोय घटस्फोटांचा हॉटस्पॉट

  • नाशिकमध्ये चाललंय काय? पाच वर्षांत दहा हजार घटस्फोट, दिवसाला येतात दहा अर्ज

नाशिक । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गेल्या काही दिवसांपासून घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढलेलं दिसतंय. अनेक सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या बातम्या वरचेवर येत असतात. तर, अनेकदा घटस्फोट घेतल्याची विचित्र कारणंही समोर येत आहे. मात्र, आता धक्कादायक माहिती समोर आली आहे की एकट्या नाशिकमध्ये पाच वर्षांत तब्बल दहा हजार घटस्फोट झाले आहेत. सोशल मीडियाचा अतिवापर, कमी झालेला पगार ही घटस्फोटाची प्रातिनिधीक कारणं आहेत.

भारतीय समाज व्यवस्थेत लग्न हा महत्त्वाचा संस्कार आहे. दोन जीवांसह दोन कुटुंबांचं नातं लग्नामुळे जुळतं. सध्या प्रमेविवाहाला अधिक पसंती मिळत असली तरीही ठरवून केलेल्या लग्नाची संख्याही जास्त आहे. मात्र, ज्या संख्येने हल्ली लग्न होत आहेत, तेवढ्याच संख्येने लग्न मोडण्याच्या घटनाही घडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या सहा महिन्यांपासून ते तीन ते चार वर्षांत लग्न मोडल्याचे प्रकार समोर आले आहेत.

नाशिकच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मते 2018 ते 2022 या पाच वर्षांमध्ये 10 हजार 14 जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत. 2018 मध्ये 1540 घटस्फोट, 2019 मध्ये 1715, 2020 मध्ये 2080, 2021 मध्ये 2327 तर 2022 मध्ये 2353 घटस्फोट झाल्याचे समोर आले आहेत. तर, अंदाजित माहितीनुसार, कोर्टात दहदिवसाला घटस्फोटाचे दहा अर्ज दाखल होत आहेत.

घटस्फोटाची कारणं काय?

  • सोशल मीडियाचा अतिरेक वापर
  • लॉकडाऊनमध्ये पती पत्नी एकत्र राहिल्याने वाद वाढले
  • मोबाईलचा वापर वाढला
  • पती-पत्नीच्या नात्यात घरच्यांनी हस्तक्षेप करणे
  • कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खालावल्याने वाद वाढले
  • वाढती महागडी लाईफस्टाईल
  • रिल्स बनवणं यामुळे घटस्फोटाचं प्रमाण
  • मित्र मैत्रीणींशी सतत बोलणं

पाच वर्षांत किती घटस्फोट, किती तडजोड?
२०१८

  • घटस्फोट १५४०
    तडजोड ३०८
    २०१९
    घटस्फोट १७१५
    तडजोड ३२४
    २०२०
  • घटस्फोट २०८०
    तडजोड ४४७
    २०२१
  • घटस्फोट २३२७
    तडजोड ४७२
    २०२२
    घटस्फोट २३५२
    तडजोड ४२३
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button