Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पावसाचं सावट! पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालणार

Maharashtra Weather | पावसासंदर्भात महत्वाची अपडेट्स आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील काही भागात पावसाने उघड दिली आहे. मात्र आता पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यात पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. किनारपट्टी भागात पावसाची तीव्रता वाढणार असून घाटांवरही येत्या ३ दिवसांत चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

हेही वाचा   –    पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह! पीकअप वाहनाची ४ ते ५ वाहनांना धडक; महिला ठार, दोघे जखमी 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मुंबई आणि पुण्यात पाऊस बरसणार आहे. तसेच पुण्याबरोबरच रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button