breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

नवरात्रौत्सव 2022 ः तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; मंदिराच्या चारही बाजूंना आकर्षक विद्युत रोषणाई

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाच्या उत्सवांपैकी शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात देवीचा उत्सव फार मोठा असल्याने सगळीकडेच नवरात्रोत्सवाची रेलचेल पाहायला मिळतेय. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या ठिकाणी मंदिर संस्थानाच्यावतीने तुळजापुरात जोरदार उत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे.

मागच्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे अनेक सणांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता सगळे सण निर्बंधमुक्त साजरा करता येणार आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये देखील आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे.

देवी नवरात्रोत्सवात घटस्थापना करण्यासाठी देवीची भोगीपूजा करुन पूजेचे श्रीफळ घटस्थापना करण्यासाठी वापरण्याची प्रथा असल्याने नवरात्रोत्सव मंडळं घटस्थापनेपूर्वी मंदिरात येऊन भोगीपूजा करुन आणि भवानी ज्योत प्रज्वलित करुन गावी नेतात. या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र तुळजापूरकडे येणाऱ्या चोहीबाजूंच्या रस्त्यावर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते भवानी ज्योत घेऊन जात असल्याचे दिसून आले. वर्षानुवर्ष भवानी मंदिरात ज्योत प्रज्वलित करुन नेणा-या मंडळाच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. चांद्यापासून ते बांद्यापर्यंतचे नवरात्रोत्सव मंडळ या तिर्थक्षेत्री येत आहेत. त्यामुळे नवरात्रोत्सव सुरु होण्यापूर्वीच तुळजापूर नगरीत भाविकांची प्रचंड गर्दी जमा होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button