breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

परभणीत नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; जिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळती

परभणी– काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 22 जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती काल रात्री सुमारे 11:30 मिनिटांनी परभणीमध्ये होता होता राहिली. वादळी वाऱ्यामुळे झाड पडल्याने परभणीतील जिल्हा रुग्णालयातील ऑक्‍सिजन गळतीला सुरुवात झाली.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर तसेच महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत संबंधित वार्डमधल्या 14 रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवलं.

रात्री 11:30 वाजता अचानक वादळी वारे वाहू लागले. परिणामी ऑक्सिजन प्लांटच्या बाजूला असलेलं एक झाड कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या पाइपलाईनवर पडलं आणि ऑक्सिजन गळतीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. ही बाब वेळीच लक्षात आल्यामुळे 14 रुग्णांना लगेचच दुसऱ्या वार्डमध्ये हलवण्यात आलं.

या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत रात्री 12 वाजता घटनास्थळी पोहोचून गळती रोखण्याचे प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. तसेच ऑक्सिजन गळती झालेल्या पाईपलाईनची दुरुस्ती रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच परभणीला कार्यक्षम आणि पूर्णवेळ देणारा पालकमंत्री हवा अशा मागणीने जोर धरला होता, त्यातच अशी घटना घडल्याने पालकमंत्री नवाब मलिक नेमके या प्रकरणात काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button