breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार, हत्येप्रकरणी नराधमाला ठाण्यातील कोर्टाने सुनावली फाशी

ठाणे |

सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या भरतकुमार धनीराम कोरी याला बुधवारी ठाणे सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. सन २०१९च्या डिसेंबरमध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा भोईवाडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी केवळ १५ दिवसांमध्ये तपास करत १६व्या दिवशी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांची खाणावळ आहे. हमालीचे काम करणारा भरतकुमार हा त्यांच्या घरी जेवण करण्यासाठी जात असे. त्यामुळे त्याची मुलीशी ओळख होती. २१ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १० वाजता भरतकुमार याने मुलीचे आइसक्रीम देण्याच्या बहाण्याने अपहरण केले. नंतर तो तिला निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. पालकांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कल्याणराव कर्पे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज आणि अन्य माहितीच्या आधारे भरतकुमार याला २२ एप्रिल रोजी भिवंडीतूनच अटक केली.

  • २५ साक्षीदार तपासले

या खटल्याची सुनावणी ठाणे सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो न्यायालयात सुरू होती. सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. तसेच २५ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे ग्राह्य धरत विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्या. कविता डी. शिरभाते यांनी भरतकुमार याला फाशीची शिक्षा ठोठावली. आरोपीला शिक्षा होण्यामध्ये मृत मुलीचे दोन भाऊ आणि डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली, असे अॅड. मोरे यांनी सांगितले. आरोपीला कलम ३०२ (हत्या), कलम ३७६ (अ)(ब) आणि पोक्सो कलम ५ (एम) व ६अंतर्गत फाशी ठोठावण्यात आली. तर, कलम ३६४अंतर्गत जन्मठेप आणि १० हजारांचा दंडही ठोठावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button