देशातील पहिल्या क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रियेचा मान मुंबईला

मुंबई : भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालामध्ये यशस्वीपणे पार पडली. मुंबईमध्ये ही शस्त्रक्रिया दोन रुग्णांवर करण्यात आली, तर युरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. टी. बी. युवराजा यांनी ५००० किलोमीटर दूर असलेल्या शांघायमधून ही शस्त्रक्रिया केली. सेंट्रल ड्रग्स स्टॅन्डर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनकडून मंजुरी मिळाल्यानंतर ‘तौमाई’ रिमोट रोबोटिक सर्जरी सिस्टीमच्या माध्यमातून ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
मुंबईमध्ये दोन रुग्णांवर रोबोटच्या मदतीने ‘रॅडिकल प्रोस्टेटेक्टॉमी’ आणि ‘पार्शियल नेफ्रेक्टॉमी’ या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी दूरुन रोबोटिक वापर सुरक्षितपणे, अचूकपणे आणि विश्वसनीय पद्धतीने करता येतो हे यातून सिद्ध झाले. दोन्ही शस्त्रक्रिया ‘तौमाई प्रणाली’चा वापर करून रिमोट पद्धतीने करण्यात आल्या. सध्या टेली-सर्जरीसाठी यूएस एफडीए स्टडीद्वारे मंजुरी मिळालेला एकमेव रोबोटिक सर्जिकल प्लॅटफॉर्म आहे. या शस्त्रक्रियांनी ‘तौमाई प्रणाली’ने सुरक्षेच्या बाबतीत काहीही तडजोड न करता, अचूकता दाखवत भौगोलिक अंतर खूप जास्त असतानाही यश मिळाले.
या आंतरराष्ट्रीय सर्जरी हाय-स्पीड, स्थिर डेटा ट्रान्समिशन आणि अनेक सुरक्षित तंत्रज्ञानामुळे शक्य झाल्या. या सिस्टीमने फक्त १३२ मिलीसेकंदाच्या अल्ट्रा-लो बायडायरेक्शनल लॅटेन्सीसह वास्तविक वेळेत यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. अतिशय कमी लॅटेन्सीमुळे शस्त्रक्रियेदरम्यान उपकरणांची सुरळीत हालचाल, अचूक डिसेक्शन आणि विश्वसनीय अंमलबजावणी शक्य झाली.
हेही वाचा – ‘अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांस २५ हजार मिळणार; जखमींना दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार’; नितीन गडकरी
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामधील युरो-ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक शस्त्रक्रियेचे संचालक (ग्रुप) डॉ. टी. बी. युवराजा यांनी यापूर्वी ४१०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. दोन मोठ्या देशांमध्ये यशस्वीपणे शस्त्रक्रिया पूर्ण केल्यामुळे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाची नावीन्यता, रुग्णांची सुरक्षा आणि उत्कृष्ट देखभाल यांच्याप्रती बांधिलकी अधिक जास्त मजबूत झाली.
या यशाने संपूर्ण भारत आणि जगभरात उत्तम दर्जाचे उपचार प्रदान करण्याचे नवे मार्ग खुले केले झाल्याचे डॉ. टी बी युवराजा यांनी सांगितले. या मोठ्या यशामुळे भारतामध्ये टेलिसर्जरीचे एक नवे युग सुरू होत असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अशी यशस्वी कामगिरी पहिल्यांदाच बजावून, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने शस्त्रक्रियेच्या पद्धतीमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
सीडीएससीओने तौमाई प्रणालीला मान्यता दिल्यानंतर, आंतरखंडीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करणारे भारतातील पहिले रुग्णालय बनणे ही आमच्या रुग्णालयासाठी आणि भारतीय आरोग्यसेवा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय अग्रेसर असल्याचे स्पष्ट झाल्याचे रुग्णालयाचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. संतोष शेट्टी यांनी सांगितले.





