TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पर्यावरण संवर्धनाचा ‘माईल स्टोन’: ‘पिंपरी-चिचवड मॉडेल’चा बोलबाला

प्रकल्पांना राज्य-परराज्यातील शिष्टमंडळाच्या भेटी

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि ‘ग्रीन सिटी’ या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाने विविध पथदर्शी प्रकल्प हाती घेतले आहेत. ‘वेस्ट टू एनजी’ अर्थात कचऱ्यापासून वीजनिर्मिती या प्रकल्पाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण झाल्यानंतर ‘पिंपरी-चिंचवड मॉडेल’ची चर्चा राज्यात जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिष्टमंडळांचा शहरात दौरा वाढला असून, असे प्रकल्प त्या-त्या शहरांमध्ये उभारण्याकरिता प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

शहरांचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे कचरा, पाणी आणि पर्यावरण या समस्या भेडसावत आहेत. १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख इतकी होती. आजच्या घडीला शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे.

सन १९९९ मध्ये महापालिकेत मोशी गावचा समावेश करण्यात आला. तत्पूर्वी, शहराच्या स्थापनेपासून या गावातील मोकळ्या जागेवर कचरा टाकला जात होता. १९९२ मध्ये अधिकृतपणे मोशी कचरा डेपोची घोषणा करण्यात आली. कचऱ्याचे डोंगर उभा राहिले. दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्यांचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाने ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव तयार केला. महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असल्यामुळे या संकल्पनेला सुरूवातील प्रचंड विरोध झाला. कचऱ्यापासून वीज निर्मिती हा मुद्दाच शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या लक्षात आली नाही. प्रशासकीय आणि राजकीय आव्हानांचा सामना करीत हा प्रकल्पाची पायाभरणी २०१८ मध्ये झाली. या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. यामाध्यमातून प्रतिदिन १ हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार असून, त्याद्वारे १४ मेगावॅट इतकी वीज उपलब्ध होईल. ही वीज कमी दरामध्ये महापालिक प्रशासनाला वापरासाठी मिळणार आहे. यातून महापालिकेच्या वीज खर्चातील आर्थिक बचत होणार आहे.

आता पुण्यातील कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे लोकार्पण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प प्रसिद्घीच्या झोतात आहे. शहराच्या विकासात हा प्रकल्प ‘माईल स्टोन’ ठरला आहे. त्यामुळे राज्यातील आणि परराज्यातील मोठ्या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांची शिष्टमंडळांचा या प्रकल्पाची पाहणी आणि कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी ओढा वाढला आहे.

‘ग्रीन सिटी’ चे शिल्पकार संजय कुलकर्णी…
पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाचे प्रमुख तथा सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या पुढकाराने शहरात पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यामध्ये बायोमायनिंग, सी एन्ड डी वेस्ट, सेबर प्रकल्प सीईटीपी, एसटीपी असे विविध प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. कचऱ्याचे डोंगर कमी करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प राबवण्यात आला. त्याआधारे पहिल्या टप्प्यात ५ मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली असून, पुढच्या टप्प्यात आणखी ३ मॅट्रिक टन कचरा जिरवण्यात येणार आहे. आगामी दोन-तीन वर्षांत मोशीतील कचरा डेपोवरील डोंगर संपुष्टात येणार आहेत. यासह आगामी काळात कचऱ्यापासून बायोगॅस आणि मिथेन निर्मिती असे प्रकल्प कार्यान्वयीत करण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार आहे. या विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या दूरदृष्टीतून शहरातील कचरा समस्या कायमस्वरुपी सोडवण्याबाबत पथदर्शी नियोजन केले जात आहेत. एमआयडीसी भागातील सांडपाणी थेट नदी पात्रात न सोडता त्यावर ‘सेबर प्रकल्प’ कार्यान्वयीत केला आहे. त्यामुळे रसायनमिश्रीत पाणी नदी पात्रात जात नाही. परिणामी, नदी संवर्धनासाठीही प्रशासन पुढाकार घेत आहे. ‘गीन सिटी क्लिन सिटी’ या हेतूने काम करणारे संजय कुलकर्णी या भविष्यातील ‘ग्रीन सिटी पिंपरी-चिंचवड’ चे शिल्पकार ठरले आहेत.

वाढती लोकसंख्या आणि कचरा, पाणी या समस्यांवर प्रगत राष्ट्रांमधील तंत्रज्ञानाच्या अधारे कायमस्वरुपी उपायोजना करणे काळाची गरज आहे. आयुक्त शेखर सिंह, पूर्व आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वेस्ट टू एनर्जी’ हा प्रकल्प पूर्णत्वास नेता आला. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले. महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण झाले. त्यामुळे अन्य मोठ्या शहरातील शिष्टमंडळ वेस्ट टू एनर्जीसह अन्य प्रकल्पांनाही भेट देत आहेत. ही बाब समाधानकारक आहे.
संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button