‘आमदार रत्नाकर गुट्टे मेले तरी..’; महादेव जानकर यांचं विधान चर्चेत

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या आठवड्यात परभणी जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी रत्नाकर गुट्टे यांची भेट घेतली. यानंतर आमदार रत्नाकर गुट्टे भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज गंगाखेडला जाऊन आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट घेतली. तसेच रत्नाकर गुट्टे रासप सोडून जाणार नाहीत, असं जाहीर केलं आहे.
महादेव जानकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी रत्नाकर गुट्टे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली. या भेटीनंतर गुट्टे यांनी लगेच मला त्या भेटीची माहिती दिली. खरंतर बावनकुळे तसं म्हणाले नाहीत. उद्या आमची युती (भाजपा-रासप) तर होणारच आहे ना? आमच्याकडून त्याला ना नाही. मी इथे आत्मविश्वासाने सांगतो रत्नाकर गुट्टे मेले तरी मला सोडून जाणार नाहीत.
हेही वाचा – पर्यावरण संवर्धनाचा ‘माईल स्टोन’: ‘पिंपरी-चिचवड मॉडेल’चा बोलबाला
दरम्यान, आमची राष्ट्रीय समाज पक्षाशी चर्चा सुरू आहे. मला खात्री आहे की महादेव जानकरसुद्धा एक दिवस आमच्याबरोबर येतील. कारण, एनडीएमध्ये त्यांची फार कुचंबना होत आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहेत.