breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Monsoon Update : राज्यात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

पुणे : नुकताच कडाक्याचा उन्हाळा सरकत असून जगाची पावसाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशा वेळी हवामान विभागाने अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मान्सूनने आगेकूच सुरू केली आहे. राज्यात मान्सून लवकरच दाखल होणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक व लक्षद्वीपमध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात पावसाच्या सरी बरसणार आहेत. ३ ते ५ जून दरम्यान केरळमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो.

हेही वाचा – ‘धरणात मुXXपेक्षा थुंकणं बरं’; संजय राऊतांचा अजित पवारांवर पलटवार

उत्तराखंडमध्ये २ जून आणि महाराष्ट्रात ४ जूनला काही भागात गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर पश्चिम बंगाल व बिहारमध्ये पुढील ५ दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.

पुढील ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव क्षेत्र, दक्षिण बंगालचा उपसागर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सून पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागाने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button