breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरातील औष्णिक विद्युत प्रकल्पात भीषण आग

चंद्रपूर |

चंद्रपुरातील औष्णिक विद्युत प्रकल्पात रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याने एकच खळबळ उडाली. 8 व 9 क्रमांकाच्या कन्व्हेअर बेल्ट ला ही आग लागली आहे. 7 व 8 क्रमांकाच्या बॉयलर जवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली अशी माहिती मिळालेली आहे.

या आगीत किती नुकसान झाले याबद्दल सविस्तर माहिती मिळालेली नाही, विद्युत उत्पादनासाठी ठेवण्यात येणारा कोळसा व त्यामधील कन्व्हेअर बेल्ट जळाला आहे. अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला असून सध्या आग काही प्रमाणात नियंत्रणात आली आहे.

वाचा- पुण्याजवळ वीज कोसळून दोन मुलींचा जागीच मृत्यू, एक जखमी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button