स्वच्छ, सुंदर पिंपरी-चिंचवड शहरासाठी मशाल यात्रा उत्साहात…
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियानांतर्गत शिवरकर चौक ते म्हेत्रे गार्डन पर्यंत “मशाल यात्रेचे” आयोजन करण्यात आले होते. या अभियानाअंतर्गत नागरिकांच्या मनात स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यात आली.ओला व सुका कचरा वर्गीकरण करून आपल्या पालिकेस सहकार्य करावे. तसेच रस्ता किंवा मोकळ्या जागेत कचरा न टाकता कचऱ्याच्या गाडीमध्येच कचरा टाकण्यात यावा, असे आवाहन या मशाल यात्रेच्या वेळी करण्यात आले.
सदर यात्रेस नारी शक्ती महिला मंचच्या अध्यक्षा नीलिमा मनोज जरे यांच्यासहित माजी नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे , माजी नगरसेवक सुरेश तात्या म्हेत्रे, योगिता ताई नागरगोजे, रावसाहेब थोरात या मान्यवरांसहित पालिका अधिकारी सीताराम भवरे , शांताराम माने, श्राकेश सौदाई, तसेच पालिकेच्या जनवाणी स्टाफमधील संदिप आडागळे, हेमंत लकारे, निखिल पवार, किशोर सगाटे, मयुर गोरे, शिवाजी पिंपळे, अक्षय लगड, सचिन दबडे, विशाल आडागळे, रितीक लोंढे, दिगंबर गाडीवाल, दिपीका इथापे,शोभा काकडे, वनिता भांगे, सोनाली अंबरकर, जयश्री महाजन तसेच पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.