breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका,हिंदुजा रूग्णालयात दाखल

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी पुन्हा एकदा हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हिंदुजा रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. याआधीसुद्धा मनोहर यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला. मात्र पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे काल हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे.

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता परत एकदा त्यांना रूग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – सिडकोच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा, वाढीव रक्कम होणार कमी, लवकरच मिळणार ताबा!

मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय विश्वासाचे आणि जवळचे सहकारी मानले जायचे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संविधानिक पदे भूषविली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं.  मनोहर जोशी यांनी नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

शिवसेनेत राहून देखील मनोहर जोशी यांना अपमान सहन करावा लागला होता, बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात अपमान सहन करावा लागला होता. दसरा मेळाव्यात शिवसैनिक मनोहर जोशी मंचावर येताच विरोधात घोषणाबाजी करत असताना मनोहर जोशी मंच सोडून निघून गेले होते यावेळी उद्धव ठाकरे किंवा इतर नेत्यांनी थांबावलं नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उद्धव ठाकरे यांचा शिवसेनेत वाढता संक्रिय सहभाग झाल्यानंतर मनोहर जोशी यांची शिवसेनेतील सक्रियता कमी झाली होती, त्यांचं वाढतं वय हा देखील एक मुद्दा होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button