breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Mahavikas Aaghadi : गुटखाबंदीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे हे आहे ‘टार्गेट’

मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यात गुटखाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यभरात कौतूक केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक विधायक निर्णयांचा धडाका लावला आहे.

राज्यातील अवैध धंद्यांना लगाम घालण्यासाठी सरकार पातळीवर सकारात्मक पुढाकार घेतला जात आहे. त्यातच राज्यात जमा होणाऱ्या महसूलात वाढ होण्याबाबतही उपाययोजना केल्या जात आहे.

अवैध लॉटरीमुळे, अन्य राज्यांच्या ऑनलाईन लॉटरीतून मिळणाऱ्या राज्याच्या महसुलाचं मोठं नुकसान होतंय. त्यामुळे अवैध लॉटरीवर निर्बंध आणण्याची गरज आहे. त्यासाठी वित्त विभाग, पोलिस व लॉटरी वितरकांनी संयुक्तपणे प्रयत्न करायला हवे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे.

पश्चिम बंगालला महाराष्ट्राचे पथक रवाना…

अवैध लॉटरीवाल्यांवर प्रतिबंध करण्याबाबत पश्चिम बंगाल सरकारने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी पोलिस व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाठवून, माहिती घेऊन त्यानुसार पुढील निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली. लॉटरीच्या महसुलातून वाढलेली रक्कम पोलिस दलाच्या गृहनिर्माणासाठी वापरण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button