महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी
![MahaRERA issues guidelines for consumer protection](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/MahaRERA-issues-guidelines-for-consumer-protection-780x470.jpg)
Maharera | घर खरेदीदारांची फसवणूक टाळण्यासाठी, त्यांना कायदाचे संरक्षण देण्यासाठी महारेराने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. घर खरेदीपूर्वी तुम्ही या सूचना तंतोतंत पाळल्यास तुमची फसवणूक तर टळेल. तसेच आयुष्यभराची जमापुंजी गुंतवणूक फसवणूक नशिबी येऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कोणत्याही गृहप्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी जुजबी माहिती घेऊ नका. तुमच्या हक्काचे घर कायद्याच्या चौकटीत बसते की नाही हे अगोदर तपासा. संबंधित प्रकल्पावर न्यायालयीन खटला सुरू आहे का? त्याचा तपशील घ्या. एखादा कर्जाचा बोजा प्रकल्पावर आहे का? ती माहिती घ्या. भागीदारांमध्ये वाद तर सुरू नाही ना? हे तपासा.
हेही वाचा : सुजाण नागरिक होण्याकरता भूगोलाची जाण आवश्यक; डॉ. विजय खरे
इतकेच नाही तर फ्लॅट खरेदीपूर्वी, घर खरेदीपूर्वी महारेराने ज्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, त्याची खातरजमा हा प्रकल्प, विकासक करतो की नाही ते डोळ्यात तेल घालून तपासा. नवीन घराची नोंदणी करताना महारेरा नोंदणीकृत प्रकल्पातच गुंतवणूक करा. अधिक माहितीसाठी तुम्ही maharera.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेटू देऊ शकता.