breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

संजू सॅमसनच्या जागी महाराष्ट्राचा ‘हा’ खेळाडू खेळणार

आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून केली उत्तम फलंदाजी

पुणे : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 1ल्या टी-20I दरम्यान सीमारेषेजवळ चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करताना सॅमसनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो होणाऱ्या उर्वरित मालिकेतून बाहेर असणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा यांनी ही माहिती दिली आहे.
संजू सॅमसनला दुखापत झाल्याने एका नव्या यष्टीरक्षकाला भारतीय संघात खेळण्याची संधी देण्यात आली आहे. संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. तो देशांतर्गत क्रिकेट सामने आणि आयपीएलमध्ये खेळलेला आहे.
संजू सॅमसन ऐवजी भारतीय संघात संधी देण्यात आलेला जितेश २९ वर्षांचा असून तो रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाकडून खेळतो. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळत उत्तम फलंदाजी केली होती. आता जितेश श्रीलंकेसोबतच्या दोन सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
श्रीलंकेच्या टी-20I साठी भारताचा संघ :
हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button