ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

Maha-E- News । ‘महाईन्यूज’च्या वृत्तसंपादकपदी पत्रकार अविनाश आदक यांची नियुक्ती

पिंपरी, चिंचवड, भोसरीसह मावळ आणि खेड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी

पिंपरी : आधुनिक न्यूज व पत्रकारिता क्षेत्रात नावाजलेले ‘महाईन्यूज’ (mahaenews.com) या डिजिटल माध्यमाच्या वृत्तसंपादकपदी पत्रकार अविनाश आदक यांची नियुक्ती करण्यात आली. संपादक अधिकराव दिवे-पाटील यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.

‘महाईन्यूज’ हे न्यूज पोर्टल २०१७ पासून सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, मनोरंजन तसेच कायदा व सुव्यवस्था अशा विविध क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी, बातम्या व विश्लेषण निष्पक्षपणे प्रसिद्ध करत आहे. त्यामुळे पुणे जिल्हा तसेच राज्यभरात ‘महाईन्यूज’ चा लाखोंचा वाचक वर्ग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर mahaenews.com डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात दर्जात्मक उंची गाठली आहे. फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि डेली हंट अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसेच e-paper स्वरुपात प्रकाशित होत आहे.

पत्रकार अविनाश आदक हे गेली 9 वर्षे पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात सक्रिय पत्रकारिता करत असून, लोकवार्ता मीडिया या डिजिटल न्यूज पोर्टल व चॅनलचे ते संपादक आहेत. त्याचबरोबर नामांकित अशा ‘रे क्रियेशन’ या डिजिटल मार्केटिंग कंपनीचे ते संस्थापक आहेत. अविनाश आदक यांची वृत्तसंपादकपदी नियुक्ती जाहीर करून संस्थापक मुख्य संपादक अधिकराव दिवे-पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सल्लागार संपादक संजीव शाळगावकर, मुख्य कार्यकारी संपादक सुनील आढाव, बिझनेस हेड पुनम पवणे, पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे कार्यकारी संपादक वैष्णव जाधव, पुणे शहर आवृत्ती समन्वयक हर्षल देशपांडे, मुख्य उपसंपादक उमेश पाटील, ग्राफीक्स विभाग प्रमुख रमेश पाटील व सर्व कार्यालयीन सहकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button