breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एलपीजी सिलेंडर स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा

मुंबई : आज गॅस सिलेंडरच्या दरात 30 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही कपात करण्यात आली आहे.IOCL नुसार, दिल्लीत १९ किलो सिलेंडरची किंमत आजपासून १७६४.५० रुपये झाली आहे. मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीडी गॅस सिलेंडरची किंमत १७९५ रुपये होती. याशिवाय गॅस सिलेडरच्या किंमत कपातीनंतर आता कोलकात्यात सिलेंडर १८७९ रुपये आहे. पूर्वी ही किंमत १९११ रुपये होती. गॅस सिलेंडर स्वस्तर झाल्यानंतर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत १७१७.५० रुपये झाली आहे, जी किंमत आधी१७४९ रुपये होती. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेडर आता १९३० रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचा – ‘सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरच्या १२ अतिरेक्यांना वाचवलं’; राम सातपुतेंचा गंभीर आरोप

दिल्लीत एलपीजी सिलेंडरचे दर ३०.५० रुपयांनी कमी झाले आहेत. कोलकात्यात गॅस सिलेंडरच्या किमती ३२ रुपयांनी कमी झाल्या .मुंबईत गॅस सिलेंडरचे दर ३१.५० रुपयांनी कमी झाले आहेत.चेन्नईमध्ये सिलेंडरच्या किमती ३०.५० रुपयांनी कमी झाल्या आहेत.घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र  कोणताही बदल झालेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button