breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
#Lockdown: UPSC परीक्षेसंबंधी मोठा निर्णय
करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसल्याने लॉकडाउन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरी सेवा पूर्व परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आली आहे. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध लक्षात घेता परीक्षा आणि मुलाखती घेणं शक्य नसल्याचा निष्कर्ष काढत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.