Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Lockdown: वर्धा, चंद्रपूरमधील हजारो परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेने आपल्या राज्याकडे रवाना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/special-train_corona.jpg)
टाळेबंदीमुळे वर्धा आणि चंद्रपूरमध्ये अडकलेले हजारो परप्रांतीय मजूर आज विशेष रेल्वे गाडीने वर्ध्यातून त्यांच्या बिहार राज्याकडे रवाना झाले. यावेळी पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे यांनी या मजुरांशी रेल्वे स्थानकावर संवाद साधत त्यांच्या सुखरूप प्रवासाच्या शुभेक्षा दिल्या.