Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साताऱ्यात ग्रंथदिंडीतून साहित्य जागर ! हजारो विद्यार्थी, साहित्यप्रेमी सहभागी

सातारा : महाराष्ट्रातील संत परंपरेपासून ते थोर साहित्यिकांपर्यंत आणि वारसा-परंपरांपासून ते निसर्ग रक्षणापर्यंत अशा विविध विषयांना कवेत घेत सातारा मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथ दिंडीने शहरात गुरुवारी साहित्याचा जागर घडवला. या दिंडीमध्ये मान्यवरांसह हजारो विद्यार्थी, साहित्यप्रेमी सहभागी झाले.

या ग्रंथदिंडीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह सुनीताराजे पवार, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष शरद बेबले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिंडीत वेगवेगळ्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या हाती घोषणा, सुविचार लिहिलेले फलक होते. ग्रंथदिंडीत ठिकठिकाणी टाळ मृदंगाचा गजर सुरू होता. तर पारंपरिक पोषाखात आलेल्या महिलांनी फुगड्या खेळल्या.

राजवाडा येथून ग्रंथ दिंडीची सुरुवात झाली. या ग्रंथ दिंडीला शिवेंद्रसिंहराजे भोसले, मिलिंद जोशी यांनी खांदा दिला. सातारा शहरातून निघालेली ही ग्रंथदिंडी राजपथ, पोवई नाका, पोलीस कवायत मैदान मार्गे श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्य नगरीकडे मार्गस्थ झाली. या ग्रंथदिंडीमध्ये ५५ शाळांतील साडेचारशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीत महाराष्ट्रातील संत परंपरेपासून ते थोर साहित्यिकांपर्यंत आणि वारसा-परंपरांपासून ते निसर्ग रक्षणापर्यंत अशा विविध विषयांचा जागर करण्यात आला.

हेही वाचा –  ‘कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे’; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

ग्रंथदिंडीत विविध देखावे सादर करण्यात आले. यामध्ये अग्रभागी साताऱ्याची ओळख असलेल्या कुपर कंपनीची आकर्षक दिंडी सहभागी झाली होती. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानकाका आणि मुक्ताबाईसह भावंडांची वेशभूषा केलेला देखावा लक्ष वेधून घेत होता. याशिवाय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व थोर समाजसुधारक महात्मा फुले यांची शिक्षण चळवळीवरही देखावे सादर करण्यात आले. जिल्ह्यातील ऐतिहासिक व पर्यटन स्थळांवरील छायाचित्रांचेही दर्शन या वेळी घडविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांवर स्वतंत्र दिंडी काढण्यात आली होती.

दिंडीत वेगवेगळ्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या हाती घोषणा, सुविचार लिहिलेले फलक होते. ग्रंथदिंडीत ठिकठिकाणी टाळ मृदंगाचा गजर सुरू होता. तर पारंपरिक पोषाखात आलेल्या महिलांनी फुगड्या खेळल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button