ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणारी घटना

कर्वेनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत तरुणाची हत्या ,मौल्यवान वस्तू घेऊन तो प्रसार

पुणे : पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला धक्का देणारी मोठी घटना घडली आहे. या घटनेमुळे पुणे शहरात सामान्य लोक सुरक्षित नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. पुण्यातील कर्वेनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत शुक्रवारी मध्यरात्री हत्या झाली आहे. कर्वेनगरमधील श्रीमान सोसायटीमधील राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय42 ) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री एक वाजता बुरखा घातलेल्या व्यक्तीने घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने वार करत त्यांचा खून केला. कुटुंबियासमोरच ही हत्या त्या व्यक्तीने केली. त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू घेऊन तो प्रसार झाला. या घटनेमुळे पुणे शहरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

कुटुंबियांसमोर केली हत्या
वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री एक वाजता राहुल निवगुंने यांचा दरवाजा अज्ञात इसमांनी वाजविला. आपल्या घरी कोणी आले असेल, या अंदाजाने राहुल निवगुंने यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. त्यावेळी राहुल यांनी आरडाओरडा केली. त्यानंतर त्यांच्या घरात असणाऱ्या तीन मुली आणि पत्नी जाग्या झाल्या. तोपर्यंत आरोपीने त्यांची हत्या केली होती. त्यानंतर घरातील दागिने आणि रोख रक्कम किंमती वस्तुची लुट करुन पसार झाले.

राहुल निवगुंने वाहन चालक
राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, पत्नी असा परिवार आहे. आरोपींचा तोंडावर बुरखा असल्याने मुलींनी आरोपींना ओळखता आले नाही. डोळ्यासमोरच वडिलांची हत्या झाल्याने त्यांच्या मुलींना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. यामुळे राहुल निवगुंने यांच्या पत्नी आणि मुली बोलण्याच्या परिस्थिती नाहीत.पुणे शहरात खून, दरोडे, हल्ले वाढले आहे. यामुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर विरोधकांकडून प्रचंड टीका केली जात आहे. पुणे पोलिसांना शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यात अद्याप यश आले नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button