breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

Pune | खडकवासला धरणाचे दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे | मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामूळे पुणे शहरातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यानुसार खडकवासला धरणातील दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा ४७०८ क्युसेक्स विसर्ग वाढवून सकाळी ७.०० वा. नदीपात्रात ९ हजार ४१६ क्यूसेक करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी, असे खडकवासला पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याने, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा      –        पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथील एसटीपी, स्पाईन रस्ता, उड्डाणपूलासाठी ‘ॲक्शन प्लॅन’

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे. याशिवाय कोणीही नदीपात्रात कोणीही उतरु नये, नदीपात्रात साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावे. योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, अशा सूचनाही खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button