breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

Pune-Mumbai Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज जम्बो ब्लॉक

Pune-Mumbai Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज गुरूवारी (१८ जानेवारी) पाच तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावर सकाळी ११ ते दुपारी १.१५ वाजेपर्यंत, तर दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कामादरम्यान पूर्णत: बंद राहणार आहे.

चिखले ब्रिज (साखळी क्रमांक कि.मी. ०७/५६०) येथे मुंबई वाहिनीवर मुंबई रेल विकास महामंडळामार्फत गुरुवारी (१८ जानेवारीला) गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी द्रुतगती मार्गावर सकाळी ११ ते दुपारी १.१५ वाजेपर्यंत, तर दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा   –    इराणचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला; दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकणार? 

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी हलकी वाहने मुंबई लेन कि.मी. क्र. ५५/५०० वरून वळवून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी हलकी वाहने आणि बसगाड्या मुंबई लेन कि.मी.क्र. ३९/८०० खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ होतील.

द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे येणारी सर्व प्रकारची वाहने खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट (कि.मी. ३२/५००) येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना मुंबई पुणे मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेंडुग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ होतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button