Ganesh Utsav 2023 : कोणत्या सोंडेचा बाप्पा घरी आणणे शुभ मानले जाते? वाचा..
![It is considered auspicious to bring bappa home from which sonde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/ganpati-bappa-780x470.jpg)
Ganesh Utsav 2023 : रक्षाबंधन, दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी झाली. आता सर्वांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. सार्वजनिक मंडळातील बाप्पा मंडप सजावटीसाठी आधीच मंडपातून बाहेर पडू लागले आहेत. तर घरगुती गणपती घरी येण्यासाठी भाविकांना आणखी थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान बाप्पाच्या मुर्तीसंदर्भातील एक अत्यंत महत्वाची बाब आपण जाणून घेणार आहोत.
बाप्पाचे आमगमन : १९ सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरी केली जाणार आहे. इथून पुढे १० दिवसांचा गणेशोत्सव सुरू होणार आहे. तर २८ सप्टेंबर रोजी बप्पाचे विसर्जन होणार आहे.
हेही वाचा – ‘मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानींचा लढा प्रेरणादायी’; शेखर काटे
कोणत्या सोंडेचा बाप्पा घरी आणणे शुभ असते?
डाव्या बाजूला सोंड असलेली मूर्ती शुभ मानली जाते आणि ती घरी आणल्याने भक्तांचे सर्व दु:ख दूर होतात असे मानले जाते. घरात सुख-शांती नादण्यासाठी डाव्या सोंडेती बाप्पाची मूर्ती बसवावी, असे पुराण्यात म्हटलं आहे. तर उजव्या बाजूला सोंड असलेली गणेशमूर्ती घरी आणू नये. अशा मूर्तीची प्रतिष्ठापना घरात करू नये, असे सांगितले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीच्या सोंडेच्या दिशेसह अनेक गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक ठेवणे आवश्यक असते.