TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमहाराष्ट्रमुंबई

पुण्यातील सर्व पर्यटन बससेवेच्या मार्गावर तिकीट दरामध्ये कपातीची नामुष्की? आता फक्त ५०० रुपयात पर्यटन बससेवा

पुणेः पुण्यातील सर्व पर्यटन बससेवेच्या मार्गावर तिकीट दरामध्ये सुधारणा करून प्रति प्रवासी तिकीट दर ५०० रुपये इतका करण्यात आला आहे. पर्यटन बससेवेस प्रवासी नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, पर्यटन बससेवेचे तिकीट दर जास्त असल्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनावर तिकीट दर कपातीची नामुष्की ओढवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर आणि १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही १ मेपासून बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या सुरू करण्यात आली आहे.

मात्र, पर्यटन बससेवेस प्रवासी नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने आणि पर्यटन बससेवेचे तिकीट दर जास्त असल्यामुळे प्रशासनाने तिकीट दर कपातीचा निर्णय घेतला आहे. पुर्वी या बसेससाठी १ हजार रुपये इतके भाडे होते. मात्र, आता ते थेट निम्म्याने कमी करून ५०० रुपये प्रति प्रवाशी असे करण्यात आले आहे. त्यामुळे जास्त तिकीट दरामुळे प्रवाशांचा अल्पप्रतिसाद मिळत असल्या कारणाने प्रशासनावर तिकीट कपातीची नामुष्की ओढवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

असा असेल पर्यटन बससेवेचा मार्ग आणि सुधारित तिकीट दर

पर्यटन बससेवा क्र. १

मार्ग – हडपसर, मोरगांव, जेजूरी, सासवड, हडपसर.

पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-

सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. २

मार्ग – हडपसर, सासवड सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकवळे), बनेश्वर मंदिर, कोंढणपूर मंदिर, हडपसर.

पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-

सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ३

मार्ग – डेक्कन, खारावडे म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा, डेक्कन.

पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-

सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ४

मार्ग – पुणे स्टेशन, खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण, पुणे स्टेशन.

पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-

सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ५

मार्ग – पुणे स्टेशन, पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम, हडपसर, पुणेस्टेशन.

पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ७००/-

सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ६

मार्ग – पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, श्री क्षेत्र तुळापूर त्रिवेणी संगम, छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन.

पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये १,०००/-

सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ७

मार्ग – भक्ती शक्ती निगडी, अप्पूघर, इस्कॉन मंदिर (रावेत), मोरया गोसावी मंदिर (चिंचवड),

प्रतिशिर्डी (शिरगांव), देहूगांव, गाथा मंदिर, आळंदी, भक्ती शक्तीनिगडी.

पूर्वीचा प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ७००/-

सुधारित प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button