जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत पंचनामे करण्याच्या सुचना.
![Instructions to conduct panchnama through the Department of Agriculture and Revenue for the damage caused by heavy rains in the district.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/नाना-पाटोळे-हे-महत्त्वाची-व्यक्ती-त्यांनी-गांभीर्याने-घेऊ-नये-संजय-राऊत-यांचा-मोलाचा-सल्ला.-7.jpg)
उस्मानाबाद: तुळजापूर तालुक्यातील सलगरा, इटकळ, जळकोट, मंगरुळ व परंडा तालुक्यातील आस, जवळा, आनाळा, सोनारी व उमरगा तालुक्यातील उमरगा, दाळिंब, गुळज, तसेच लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी व उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे मी स्वतः दि.१० जुलै रोजी मेंढा, लासोना, सांगवी, बोरखेडा, कनगरा, बोरगाव (राजे), घुगी, पाडोळी, कामेगाव तसेच समुद्रवाणी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे ओढा नाल्यांना पूर आला होता या पुरामध्ये लासोना येथील बबन भगवान रसाळ (वय 42) व कनगरा येथील समीर गुनुस शेख (वय 27) हे दोघेजण वाहून गेले होते. त्यापैकी समीर मुनुस शेख यांचा मृतदेह सापडला आहे. परंतु राहीलेल्या एकाचा शोध सुरु असून अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही त्यामुळे शोध मोहीमेचे कार्य युध्द पातळीवर सुरु करने आवश्यक आहे. पावसाचे पाणी गावात शिरल्याने घरांची पडझड झाली व नुकतीच पेरणी केलेली पिके, जमिनी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्या आहेत तसेच रस्त्यावरील जुने पुल व बंधारे वाहून गेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे, पिक नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे तसेच जिवीत हानीचे पंचनामे तात्काळ करणे. वाहून गेलेले पुल व बंधारे याची देखील दुरुस्ती करणे आवश्यक आहे तसेच मयत समीर युनुस शेख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे कृषी व महसूल विभागामार्फत तात्काळ पंचनामे करणे बाबत मा.जिल्हाधिकारी साहेब, उस्मानाबाद यांच्या कडे काल पत्राद्व्यारे केली होती. त्यापत्राची मा.जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन पण पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
तरी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे, घरांचे, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत. व काही अडचण आल्यास खासदार संपर्क कार्यालयाशी संपर्क करावा.