इंदोरीकर महाराजांचे ३० मेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द, गैरसोयीबद्दल माफी मागत काढलं पत्रक
![इंदोरीकर महाराजांचे ३० मेपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द, गैरसोयीबद्दल माफी मागत काढलं पत्रक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/इंदोरीकर-महाराजांचे-३०-मेपर्यंत-सर्व-कार्यक्रम-रद्द-गैरसोयीबद्दल-माफी-मागत.jpg)
अहमदनगर : समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (indurikar maharaj )यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा विश्राम करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्यांचे २३ मे ते ३० मेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. खरंतर, भजन-किर्तनं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. अशात किर्तन म्हटलं की आठवतात ते समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (indurikar maharaj kirtan). इंदोरीकर महाराजांचे किर्तन ऐकण्यासाठी सगळेच उत्साही असतात.
पण आता पुढचे काही दिवस त्यांचे किर्तन ऐकता येणार नाही. कारण, त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. ह.भ.प निवृती महाराज देशमुख यांचे अनेक ठिकाणी किर्तनाचे कार्यक्रम होते. पण सर्व कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आयोजकांची गैरसोय झाली आहे. यासंबंधी इंदोरीकर महाराजांची दिलगीरी व्यक्त केली असून पत्रक जारी केले आहे. तर वैद्यकीय उपचारानंतर पुन्हा सेवेत रूजू होणार असल्याचंही त्यांनी पत्रामध्ये लिहलं आहे.