छत्रपती संभाजीनगरात एकाचवेळी ११ ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी
![Income Tax Department raids at 11 locations in Chhatrapati Sambhajinagar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Income-Tax-Department-Raid-780x470.jpg)
Income Tax Department Raid : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्या आहेत. यावेळी आयकर विभागाने संभाजीनगर शहरात ११ ठिकाणी एकाचवेळी या धाडी टाकल्या आहेत.
महत्वाचं म्हणजे या कारवाईत २०० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समावेश असल्याचे समोर येत आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास आयकर विभागाने अचानक अकरा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या आहे.
हेही वाचा – ‘राज्यात नामर्दांचं सरकार’; संजय राऊतांची खोचक टीका
शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकांवर ही कारवाई करण्यात येत असल्याचं कळत आहे. या बांधकाम व्यवसायिकांच्या घर आणि कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू असणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.