TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

‘बाशिम’ गावात लहानग्यांनी अनुभवली ग्रामीण संस्कृती

  • शताब्दीपूर्ती निमित्त मएसो बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेत आयोजन

पुणे : चावडीवर दोघा भावांतील तंटा सोडवणारे पंच, गावाला जागे करणारे वासुदेव, विहीर व हातपंपावर पाणी भरणाऱ्या बाया, कावडीतून पाणी वाहून नेणारे पुरुष, टुमदार घरे, बारा बलुतेदार, हिरवीगार शेती, गावाचा बाजार, जत्रा अन बैलगाडी अवतरली थेट भांडारकर रस्त्यावरील डेक्कन जिमखान्याच्या ‘बाशिम’ गावात!

मराठी राजभाषा दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सोमवारी पुण्याच्या मध्यवर्ती भागात ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती अवतरली. भांडारकर रस्त्यावरील मएसो बालशिक्षण मंदिर शाळेच्या शताब्दी पूर्ती वर्षानिमित्त खास दोन दिवसांच्या ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘बाशिम’गाव साकारण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन पाहता येणार आहे. शिशुनिकेतन व चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, ग्रामीण संस्कृतीची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे.

या बाशिम गावात ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, पाटलांचा वाडा, कौलारू घरे, मंदिरे, चावडी, शेती व त्यासाठी अवजारे, बाजारहाट, जत्रा, बैलगाडी, गोठा, न्हावी-सुतार-कुंभार-लोहार यासारखे बारा बलुतेदारी करणारे ग्राम व्यवसाय, विविध प्रकारचा रानमेवा आहे. गावातील भजन-कीर्तन, पालखी सोहळा, लोककला व संस्कृतीचे सादरीकरण लक्षवेधी आहे. बैलगाडीची मनसोक्त रपेट मारून झाल्यावर लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलते.

याबाबत बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण म्हणाल्या, “शाळेने १०१ व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्ताने वर्षभर मुलांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारे वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्याचे एकत्रित सादरीकरण या दोन दिवसात झाले आहे. दुरून दिसणारे आणि गावाच्या अंतरंगात काय काय सामावले आहे, याचे दर्शन यातून घडते. मुलांना गाव, तेथील संस्कृती, रचना, विविध घटक यासह रानमेव्याची ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमात १ ली ते ४ थी या वर्गातील सर्व मुले, त्यांचे शिक्षक व पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button